नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी  
मुख्य बातम्या

नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी

टीम अॅग्रोवन

नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा मिळाव्या, यासाठी दुसऱ्या टप्प्याकरिता सरकारकडून ८६ कोटी २८ लाख २० हजार रुपये अनुदान जिल्हा प्रशासनाला शनिवारी (ता. १५) प्राप्त झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने आता वाटपाची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. 

द्विवेदी यांनी जिल्ह्यात ५१३ छावण्यांना मंजुरी दिली. त्यापैकी ५०४ छावण्या सुरू आहेत. त्यात लहान-मोठ्या पशुधनाची संख्या तीन लाख ३३ हजार आहे. प्रशासनाने सतर्कता राखून १५ एप्रिलपर्यंतचा अवधी लक्षात घेऊन, ४६ कोटी ८१ लाख २१ हजार १९९ रुपयांच्या निधीचा अहवाल विभागीय आयुक्तांतर्फे सरकारला सादर केला. चार एप्रिल रोजी या प्रस्तावावर सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर प्राप्त निधीतून चालक संस्थांना प्रथम ५० टक्के, नंतर २५ टक्के अशी एकूण ७५ टक्के रक्कम देण्यात आली. 

१५ एप्रिलपुढील मुदतीचा विचार करून प्रशासनाने १२७ कोटींची मागणी विभागीय आयुक्तांतर्फे सरकारकडे केली होती. त्यानुसार ८६ कोटी २८ लाख २९ हजार रुपयांचा निधी आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. थकीत रक्कम मिळाली असल्याने काही प्रमाणात छावणीचालकांना दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT