685 minor in Marathwada 75% water storage in the project
685 minor in Marathwada 75% water storage in the project 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात ६८५ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍के पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत ८७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. गतवर्षी २०२० मध्ये या वेळी या प्रकल्पांमध्ये ७८ टक्‍के, तर २०१९ मध्ये ४८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा होता. औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एक मिळून दोन लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. ६८५ लघू प्रकल्पांत ७५ टक्क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

यंदा पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने केलेल्या कहरामुळे जवळपास सर्वच प्रकल्पांमध्ये मोठा पाणीसाठा होण्यास मदत झाली. ८७५ मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये आजघडीला ९६.२५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांत ९९.८४ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांत ९८.५४ टक्‍के, ७४९ लघू प्रकल्पांत ८७.२० टक्‍के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ८२.२१ टक्‍के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांत ८९.३८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 

लघू प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ८८ टक्‍के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ९८ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ९६ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ९४ टक्‍के, उस्मानाबादमधील २०६ प्रकल्पांत ६९ टक्‍के, नांदेडमधील ८४ प्रकल्पांत ९७ टक्‍के तर परभणीतील २२ व हिंगोलीतील २६ प्रकल्पांत प्रत्येकी ९४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. मध्यम ७४ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. 

आठ मोठे प्रकल्प तुडुंब

अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प तुडुंब आहेत. दोन प्रकल्पांत अनुक्रमे ९९ व ९६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. मध्यम ७५ प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६, जालन्यातील ९, नांदेडमधील ९ प्रकल्पात ९९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील १६ व परभणीतील २ मध्यम प्रकल्प तुडुंब आहेत. उस्मानाबादमधील १७, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पांत ९७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT