‘ती’ गुलाबी बोंडअळी नसून बोंडसड 
मुख्य बातम्या

‘ती’ गुलाबी बोंडअळी नसून बोंडसड

माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे शुक्रवारी (ता.२०) केंद्र शासनाच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूरच्या पथकाने वाई बाजार येथील बंडू गेडाम यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली.

टीम अॅग्रोवन

नांदेड  : माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे शुक्रवारी (ता.२०) केंद्र शासनाच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूरच्या पथकाने वाई बाजार येथील बंडू गेडाम यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी पथककाडून कपाशीवर बोंडअळी नाही तर बोंडसड होऊन त्यावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी नागपूर कीटक व्यवस्थापन केंद्राच्या केंद्रीय पथकात वनस्पती पॅथॉलॉजीचे वनस्पती संरक्षण अधिकारी एस. महेश, तांत्रिक अधिकारी के. नीतीराज यांचा समावेश होता.     सोबतच जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तालुका कृषी अधिकारी बी. बी. मुंडे, कृषी सहाय्यक विठ्ठल ईटकापल्ले, प्रगत शेतकरी संदीप पडलवार, डॉ. बाबा डाखोरे, कैलाश बेहेरे, मृणाल येवतकर, अमजद हैदर खान पठाण आदींची उपस्थिती होती.  अमृत देशमुख यांनी बोंडअळी संदर्भात पडताळणी पथकासमोर मुद्दे मांडले. कापूस बियाणे घेताना घ्यावयाची दक्षता या संदर्भात केंद्रातील पथकांनी विश्लेषक विनिमय करून शेतकऱ्यांनी समूह शेतीचा पर्याय निवडल्यास कापसावर आलेल्या भयंकर रोगावर देखील नियंत्रण मिळवता येते. यासाठी येथील शेतकऱ्यांना केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूर येथे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही पथकाने दिला. लवकरच माहूर तालुक्यातील वीस ते पंचवीस शेतकरी नागपूर येथे प्रशिक्षणासाठी आणणार असल्याची ग्वाही डॉ. डाखोरे व संदीप पडलवार यांनी दिली. बॅक्टेरियामुळे बोंडसड होऊन कालांतराने त्यात अळी निर्माण होऊन होणाऱ्या नुकसानीचे निराकरण करण्यासाठी पथकातील वनस्पती पॅथॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT