सूतगिरणी
सूतगिरणी 
मुख्य बातम्या

संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा पुन्हा ‘शाॅक’

Raj Chougule

कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा उगारल्याने प्रत्येक सूतगिरणीला महिन्याला दहा ते बारा लाख रुपयांचा फटका बसत आहे. यामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या सूतगिरण्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य शासनाने वीजदरात युनिटला सहकारी सूतगिरण्यांना ३ रुपये, खासगी गिरण्यांना २ रुपये आणि यंत्रमाग कारखान्यांना एक रुपये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. तो अमलात येण्याअगोदरच सप्टेंबरमध्ये एक ते दीड रुपयाची वाढ केली आहे. सूतगिरण्यांना बाजार व सरकारी निर्णय या दोन्ही पातळीवर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारला या प्रश्‍नी गांभीर्य नसल्याने सूतगिरण्या आता उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या मानसिकतेत आहेत. याबाबतीत पुढील आंदोलनाचा लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. 

राज्यात १३० सहकारी तर ९४ खासगी सूतगिरण्या आहेत. सुताला अपेक्षित किंमत मिळत नसल्याने सूतगिरण्यांचा तोटा वाढत आहे. या अडचणी सूतगिरण्यांनी मांडल्यानंतर यंत्रमाग, प्रक्रिया गारमेंट,  होजिअरी प्रकल्पांच्या वीज दरात दोन रुपये सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु या निर्णयला सहा महिने झाले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. सवलत मिळण्याची कार्यवाही प्रलंबित असताना आता सप्टेंबर महिन्यात विजेच्या दरात युनिटला एक ते दीड रुपयाची वाढ झाली आहे. बाजारात कापडाला मागणी नसल्याने माफक प्रमाणात कापूस, सूत, कापड खरेदी होत असून वस्त्रोद्योगाचे वेळापत्रकच कोलमडल्याची स्थिती निर्माण झाल्याचे सूतगिरण्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.  सूतगिरण्यांच्या अडचणीत वाढ

  • बाजारात सूताला मागणीच नाही
  • उत्पादन खर्चात १८ टक्के वाढ
  • गेल्या काही दिवसात पन्नास रुपयांनी दर उतरले.
  • लांब धाग्याच्या रुईचे दर उच्चांकी पातळीवर 
  • ३७० कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीची अंमलबजावणी नाही 
  • पंचवीस हजार चात्यांच्या सूतगिरणीला दर महा १० ते १२ लाख रुपयांचा बोजा पडणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

    Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    SCROLL FOR NEXT