पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक
पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक 
मुख्य बातम्या

पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

वृत्तसेवा

मुंबई : ग्रामीण भागातील पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक कृषी पद्धती जपून कृषी पर्यटनाला वाव देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात बुधवार (ता. १७) एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष भगवानराव तावरे, कार्यक्रमाचे संयोजक पांडुरंग तावरे आदी या वेळी उपस्थित होते. पर्यटनमंत्री रावल म्हणाले, की स्वित्झरलँड, मलेशिया, थायलंड या देशांच्या विकासामध्ये कृषी पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यामुळे त्या देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होते. आपणही अशा विकसित देशाची कृषी पर्यटन प्रणाली अंगीकृत करून देशाच्या विकासामध्ये वाढ होण्यास मदत करू शकतो, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या वेळी सांगितले. राज्यात सध्या ५०० च्या वर कृषी पर्यटन केंद्रे आहेत. राज्यातील जवळपास २० लाख पर्यटक हे कृषी पर्यटन केंद्राचा लाभ घेत आहेत. भविष्यात ही संख्या वाढणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटन विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, की आगामी काळात कृषी पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन देशपरदेशांतून पर्यटक आकर्षित व्हावेत व स्थानिकांना, तरुणांना व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती उत्पन्नात भर पडेल या दृष्टीने वस्तुस्थितीवर आधारित आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यापुढील काळात कृषी व कृषी पर्यटनविषयक बाबींच्या बैठका प्रत्यक्ष त्या त्या विभागातील कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणीच स्वत: घेणार आहे.  पालघर जिल्ह्यातील हार्मोनी व्हिलेज, ढेपेवाडा (जि. पुणे), सिट्रस फार्म्स (अमृतसर, पंजाब), दाजी नि वाडी (सुरत, गुजरात), महाजन वावर (नागपूर) या पर्यटनविषयक प्रकल्पांना या वेळी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT