Work completed on 2,053 farms in Satara
Work completed on 2,053 farms in Satara 
मुख्य बातम्या

साताऱ्यात २,०५३ शेततळ्यांची कामे पूर्ण

टीम अॅग्रोवन

सातारा ः युती सरकारने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेस महाविकास आघाडीने ब्रेक लावल्याने जिल्ह्यात शेततळी बनवलेले १८६ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या शेततळ्यांचे अनुदान देण्यासाठी ८४ लाख ५४ हजार ६११ रुपयांची गरज आहे. या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ५३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून हजारो हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणीसाठा होण्यासाठी युती शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली होती. सुरुवातीच्या काळात ही योजना दुष्काळी तालुक्‍यासाठीच होती. त्यामुळे इतर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या योजनेमध्ये बदल करत ती सर्वसमावेशक केल्याने या योजनेस प्रतिसाद वाढला होता. या योजनेतून जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

जिल्ह्यात दोन हजार ५३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले. त्यापैकी एक हजार ८६७ शेततळ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने या योजनेस ब्रेक लावला. मे महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून नवीन कामे सुरू करू नयेत. नवीन कामांची आखणी न करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कृषी विभागाकडून पूर्ण झालेल्या शेततळ्यांचे अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा केला जात असला तरी अजूनही अनुदान जमा झालेले नाही.

तालुकानिहाय अनुदान देय असलेली शेततळी ः सातारा- ४, कोरेगाव- १८, खटाव- २५, माण- ८१, फलटण- १४, वाई- २, खंडाळा- १२, जावळी- ८, पाटण- १५, कऱ्हाड- २.

शेततळ्यांमुळे बागायती क्षेत्रात वाढ या योजनेतून आतापर्यंत सातारा- ११६, कोरेगाव- २५७, खटाव- ३६३, माण- ४५३, फलटण- ३७६, वाई- १०२, खंडाळा- १२६, महाबळेश्वर- २१, जावळी- २९, पाटण- ९०, कऱ्हाड- १२० अशी एकूण २,०५३ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यातील बहुतांश शेततळ्यांत पाणी साठवले जात आहे. त्यामुळे संरक्षित पाणीसाठा वाढला असून, बागायती पिके केली जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT