सावित्रीबाई फुले जन्मदिनी महिला शिक्षण दिन जाहीर  
मुख्य बातम्या

सावित्रीबाई फुले जन्मदिनी महिला शिक्षण दिन जाहीर 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे असून त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

टीम अॅग्रोवन

सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे असून त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. ३) सांगितले. 

नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास श्री. भुजबळ यांनी अभिवादन करून पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पाहणी केली. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी खासदार समीर भुजबळ, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनीही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले. 

मंत्री भुजबळ म्हणाले, की फुले दांपत्यांनी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे. यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्‍वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचा गौरव ब्रिटिश सरकारने केला. महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दांपत्यांनी केलेल्या कार्याचीही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. 

आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहे हे फक्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व त्यागातून शक्य झाले. अनेक अडचणींवर मात व समस्यांना तोंड देऊन त्यांनी आपले काम अखंड सुरू ठेवले. त्यांचा जन्म दिवस आता महिला शिक्षण दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होणार आहे. आता लागलेल्या शालेय, महाविद्यालयीन निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. फुले दांपत्यांचे काम ऊर्जा व प्रेरणा देणार असून महाराष्ट्रातील एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करू, असे सांगून मंत्री वर्षा गायकवाड यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT