Why shut down industries that support farmers? 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का बंद ठेवता?

नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र, शेतकरी अडचणीत असताना त्यांचा ज्यावर उदरनिर्वाह व अर्थकारण अवलंबून आहे. असे शेतकऱ्यांच्या हक्काचे बंद पडलेले उद्योग मागण्या करूनही का सुरू होत नाही, असा संतप्त सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी केला.

टीम अॅग्रोवन

नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र, शेतकरी अडचणीत असताना त्यांचा ज्यावर उदरनिर्वाह व अर्थकारण अवलंबून आहे. असे शेतकऱ्यांच्या हक्काचे बंद पडलेले उद्योग मागण्या करूनही का सुरू होत नाही, असा संतप्त सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी केला.

निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना व केजीएस साखर कारखान्याचे शेतकरी, वाहतूकदार यांचे थकीत पेमेंट परत मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी श्री. वडघुले यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. ६) मोर्चा नेण्यात आला. या वेळी ते बोलत होते. मात्र, शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम होते.

या वेळी आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. मोर्चात शेतकरी संघर्ष संघटनेचे विभागीय अध्यक्ष नाना बच्छाव, तालुकाध्यक्ष संजय पाटोळे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष सुधाकर मोगल, बळवंत जाधव, नितीन कोरडे यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT