What to do with small orange fruit? 
मुख्य बातम्या

लहान संत्रा फळांचे करायचे काय?

लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड येथील खासगी कंपनीकडून प्रक्रिया होत असल्याने आतापर्यंत अशा फळांच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न निकाली निघत होता. यंदाच्या हंगामात मात्र कंपनीने अशा फळांची खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संत्रा उत्पादकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टीम अॅग्रोवन

नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड येथील खासगी कंपनीकडून प्रक्रिया होत असल्याने आतापर्यंत अशा फळांच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न निकाली निघत होता. यंदाच्या हंगामात मात्र कंपनीने अशा फळांची खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संत्रा उत्पादकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भात प्रस्तावित संत्रा प्रक्रिया उद्योग तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रभावामुळे नांदेड येथे पळविण्यात आला होता. हा प्रकल्प पुढे कार्यान्वित झाल्यानंतर त्याकरिता लागणाऱ्या लहान आकाराच्या फळांची खरेदी विदर्भातून होत होती. गेल्या वर्षी देखील या प्रकल्पाकरिता विदर्भातून लहान आकाराच्या फळांची खरेदी झाली. ५० एम.एम. आकाराचे या फळांना बाजारपेठेत मागणी राहत नाही. 

त्यामुळे नाइलाजाने ही चुरी फळे शेताच्या बांधावरच्या शेतकऱ्यांना फेकून द्यावी लागतात. यंदा मात्र नांदेड येथील प्रक्रिया उद्योजकाने लहान आकाराची ही फळे खरेदीस नकार दिला आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात अशा फळांचे करावे तरी काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाने अशा प्रकारचा निर्णय का घेतला, याबाबत देखील स्थानिक संत्रा उत्पादकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. 

नांदेड येथील प्रकल्प अडचणींमुळे बंद नांदेड येथील एका खासगी कंपनीकडून दररोज सुमारे २५० ते ३०० टन लहान आकाराच्या फळांची खरेदी होते. कंपनीद्वारे अशा फळांवर प्रोसेसिंग केले जाते. हंगामात ३० ते ३५ हजार टन संत्रा कंपनी खरेदी करत असल्याने संत्रा बाजार स्थिर राहण्यास मदत होत असल्याची माहिती विदर्भातील संत्रा उत्पादकांनी दिली. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी देखील काही अडचणींमुळे प्रकल्प बंद ठेवावा लागत असल्याचे सांगितले.

राज्यातील संत्रा बागायती क्षेत्र

  • संत्रा लागवड : एक लाख ५० हजार हेक्टर
  • एकूण उत्पादन : सात लाख ४२ हजार टन
  • सरासरी उत्पादकता : ५.५ टन
  • लहान आकाराची फळे : एकूण उत्पादनाच्या ३० टक्के
  • शासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करून संत्रा उत्पादकांच्या हितासाठी या प्रकल्पाला फळांचा पुरवठा सुरळीत राहावा याकरिता व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

    शासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करून संत्रा उत्पादकांच्या हितासाठी या प्रकल्पाला फळांचा पुरवठा सुरळीत राहावा याकरिता व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Loan Waiver Eligibility: जिल्हा सहकारी बँकेचे ३ हजार ८९९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र

    Latur Revenue Commissionerate: लातूरला विभागीय महसूल आयुक्तालय द्या; आमदार अभिमन्यू पवार यांची विधानसभेत मागणी

    Khandesh Fertilizers Supply: खानदेशात खतांचा कमी पुरवठा; संयुक्त खतांची मागणी अधिक

    Crop Insurance Scheme: सुधारित पीकविमा योजना लागू; खरिपातील १४ पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज

    Maharashtra Rain Forecast: राज्यात ९ जुलैपर्यंत पावसाला पोषक स्थिती

    SCROLL FOR NEXT