farmer market
farmer market  
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार सुरू होणार

टीम अॅग्रोवन

पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बंद असलेले पुणे जिल्ह्यातील गाव पातळीवरील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता गाव पातळीवरील सर्व प्रकारचे आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल राम राम यांनी दिले आहेत.   जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तेरा मार्च रोजी गावपातळीवर भरणारे सर्वच प्रकारचे आठवडे बाजार बेमुदत बंद करण्याचे आदेश दिला होता. आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका छोट्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. ग्रामीण भागातील अर्थकारणावरही याचा परिणाम झाला होता.  आठवडे बाजार सुरू करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आठवडे बाजार सुरू करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन न झाल्यास, अटीचे उल्लंघन होणारे आठवडे बाजार तात्काळ बंद करण्यात येतील, असेही नवल किशोर राम यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.  या सूचनांचे करावे लागणार पालन

  • आठवडे बाजारात नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक. 
  • रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा
  • दुकाने आणि ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे
  • गुटखा, पान, तंबाखू खाणे, मद्यपानास मनाई
  • बाजाराची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग वारंवार निर्जंतुक करावे
  • प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅन, हात धुणे, सॅनिटायझरची ग्रामपंचायतींनी व्यवस्था करावी. 
  • किकवीचा गुरांचा बाजार होणार सुरू पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले आठवडे बाजार आजपासून सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील गुरांचे बाजारही सुरू करण्यात येत आहे. भोर तालुक्यातील किकवी येथील गुरांचा बाजारही सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिले. मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. शेतीसाठी पशुधन उपलब्ध व्हावे यासाठी किकवी येथील गुरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी शिवतरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर काही क्षणातच हा बाजार सुरू करण्यात येत असल्याचे भोरचे प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांनी शिवतरे यांना कळविले.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    SCROLL FOR NEXT