आठवडी बाजार बंदचा  भाजीपाला उत्पादकांना फटका Weekly market closure Vegetable growers hit 
मुख्य बातम्या

आठवडी बाजार बंदचा भाजीपाला उत्पादकांना फटका 

खानदेशात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायासंबंधी आठवडी बाजार सहा मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणाही केली आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायासंबंधी आठवडी बाजार सहा मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणाही केली आहे.

परंतु यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास कमी दर मिळत आहेत. दुसरीकडे ग्राहकांना महागडा भाजीपाला शहरात खरेदी करावा लागत आहे. जळगाव व इतर शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी बाजार सुरू करावेत, अशी मागणी पुन्हा एकदा केली जात आहे. जळगाव शहरात आठवडी बाजाराबाबत गेले सात ते आठ वर्षे शेतकरी मागणी करीत आहेत.

शेतकरी ते ग्राहक यांच्यात थेट व्यवहार व्हावा, थेट विक्री ही संकल्पना यामागे आहे. त्यासाठी जळगाव शहरात शिवतीर्थ मैदान, महाराणा प्रताप चौक आदी जागांबाबतही प्रस्ताव ठेवण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बाजार सुरू झाले नाहीत. 

कोरोनाच्या संकटात पणन व्यवस्थेला फटका बसत असून, त्यात शेतकरी व ग्राहक यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी बाजार सुरू करण्यास, खासगी बाजाराला चालना देण्याची मागणी देखील केली जात आहे. बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या नावे कारवाई सत्र सुरू आहे. 

सध्या भाजीपाल्याचे दर दबावात आहेत. टोमॅटो, कांदा, मेथी पोकळा, पालक, बीट रूट आदी पिकांचे दर घसरले आहेत. कारण आठवडी बाजार बंद आहेत. शहरात काही प्रस्थापित बाजारात भाजीपाल्याची किरकोळ विक्री सुरू आहे. पण तेथे दर अधिक आहेत. यात ग्राहकांचे नुकसान होत आहे. यामुळे आठवडी बाजाराला सशर्त परवानगी दिली जावी, अशी मागणी देखील केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT