मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज 
मुख्य बातम्या

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज

गणेश कोरे

मुंबई/पुणे : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागांत ५ ते १४ ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.

अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादनास नुकसान होऊ शकते. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसू शकतो. शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल, तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.

या काळात विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटनादेखील घडू शकतात, अशा वेळी ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वतःचा आणि जनावरांच्या विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. ५ ते १४ ऑक्टोबर या काळात मुंबई आणि कोकणपट्ट्यातदेखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राज्यात आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. तर पुढील तीन दिवसांत शुक्रवार (ता. ६) व शनिवारी (ता. ७) मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी; तर काेकण गाेवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवार (ता. ३)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात काेकण, गाेवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी; तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः

काेकण - गाेवा ः कणकवली, लांजा, रत्नागिरी, वैभववाडी प्रत्येकी ५०, संगमेश्‍वर, देवरुख प्रत्येकी ४०, चिपळूण ३०, मालवण, पाेलादपूर, राजापूर प्रत्येकी २०

मध्य महाराष्ट्र - पन्हाळा ६०, राधानगरी ४०, माढा ३०,

मराठवाडा - देगलूर, गंगाखेड, हदगाव, मुदखेड, परभणी, तुळजापूर प्रत्येकी २०

विदर्भ ः गाेंदिया, गाेंड पिंपरी प्रत्येकी १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT