मुख्य बातम्या

विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे ः विदर्भात काही ठिकाणी आज (ता. ८) मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहून काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. ९) पुणे परिसरात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.   लक्षद्वीप परिसर ते तेलंगाणा, कर्नाटक या भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याचा अंदाज असून, येत्या शनिवारपर्यंत (ता. १०) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  राज्यातील बहुतांशी भागात बुधवारी (ता. ७) ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा वाढला होता. कोकणातील भिरा येथे सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील अनेक भागांत, नगर, पुणे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांत काहीअंशी ढगाळ हवामान होते. तसेच कोकणातील ठाणे, रायगड या भागांतही हवामान ढगाळ होते.   विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर कोकण, गोवा व विदर्भाच्या उर्वरित भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. बुधवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेले कमाल व कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः   मुंबई ३१.४ (२५.४), सांताक्रूझ ३३.७ (२४.०), अलिबाग ३१.४ (२३.२), रत्नागिरी ३२.२ (२२.०), डहाणू ३१.७ (२४.९), भिरा ४१.५(२०.५), पुणे ३५.७ (१८.१), नगर ३७.३ (१९.४), जळगाव ३७.४ (१९.४), कोल्हापूर ३६.० (२१.१), महाबळेश्वर ३१.२ (१८.७), मालेगाव ३६.० (२०.०), नाशिक ३४.८ (१८.२), सांगली ३६.८ (१९.९), सातारा ३५.४ (१८.५), सोलापूर ३८.४ (२०.८), उस्मानाबाद ३५.८, औरंगाबाद ३५.६ (२३.०), परभणी ३७.४ (२२.५), नांदेड ३८.० , अकोला ३८.३ (२३.०), अमरावती ३७.२ (२२.०), बुलडाणा ३५.५ (२०.८), ब्रह्मपुरी ३६.९ (१६.९), चंद्रपूर ३७.४ (२३.०), गोंदिया ३४.५ (१९.२), नागपूर ३५.४ (१७.२), वाशीम (२०.०), वर्धा ३६.० (२०.०), यवतमाळ ३६.० (२२.४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT