राजस्थानच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती 
मुख्य बातम्या

राजस्थानच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती

टीम अॅग्रोवन

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत नाही, तेच राजस्थानच्या वायव्येच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती 11 ते 12 डिसेंबर या दरम्यान अधिक सक्रिय होणार आहे. यामुळे जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पंजाब, हरियाना आणि चंडिगड या भागात जोरदार पाऊस पडेल. त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसला, तरी वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होऊन हळूहळू ते विरून जाण्याची शक्‍यता आहे. तरीही पश्‍चिम बंगाल, उडिसा, आंध्र प्रदेश या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारी (ता.8) सायंकाळी गोपाळपुरापासून आग्नेयकडे 510 किलोमीटर अंतरावर होते. मच्छिलीपटनमपासून आग्नेयकडे 610 किलोमीटर अंतरावर होते. या क्षेत्राच्या वाऱ्याचा वेग ताशी 33 किलोमीटर एवढा होता. त्यामुळे उडिसा, आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर अधिक हानी होणार नसली तरी, नागरिकांनी सावध राहावे. तसेच मच्छीमारांनी आज आणि उद्या मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर झाला आहे. सध्या राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत आठ ते नऊ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली. शुक्रवारी (ता. 8) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे 13.8 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी (ता.8) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई (सांताक्रुझ) 18.0 (7), अलिबाग 20.8 (2), रत्नागिरी 21.6 (1), डहाणू 19.5 (1), भिरा 18.5, नगर 19.6 (7), पुणे 18.2 (7), जळगाव 17.6 (5), कोल्हापूर 19.9 (1), महाबळेश्वर 15.6 (2), मालेगाव 18.0 (7), नाशिक 16.2 (4), सांगली 19.1 (5), सातारा 17.3 (4), सोलापूर 17.3 (2), औरंगाबाद 20.7 (9), बीड 20.2 (8), उस्मानाबाद 14.0, परभणी 18.0 (4), नांदेड 17.0 (4) अकोला 18.6 (5), अमरावती 18.2 (3), बुलढाणा 17.8 (3), चंद्रपूर 17.6 (4), गोंदिया 13.8 (1), नागपूर 16.0 (3), वर्धा 16.4 (2), यवतमाळ 15.8 (1)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT