आम्हीच ओबीसीचे मसिहा असल्याचे भासवू नका We are the messiah of OBC Don't pretend to be 
मुख्य बातम्या

आम्हीच ओबीसीचे मसिहा असल्याचे भासवू नका

इम्पिरिकल डाटा आम्ही दिला, तरी आरक्षण ५० टक्क्यांच्यावर नेता येत नाही. ५० टक्क्यांच्यावर आरक्षण न्यायचे असेल तर त्याला घटनादुरुस्तीच करावी लागते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला आहे.

टीम अॅग्रोवन

नागपूर : इम्पिरिकल डाटा आम्ही दिला, तरी आरक्षण ५० टक्क्यांच्यावर नेता येत नाही. ५० टक्क्यांच्यावर आरक्षण न्यायचे असेल तर त्याला घटनादुरुस्तीच करावी लागते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही घटनेच्या बाहेर जाऊन बोलू नये. आम्हीच ओबीसीचे मसिहा आहोत, असे भासवू नये, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांवर केली. नागपुरात पत्रकारांशी ते बोलत होते.   राज्यघटनेच्या पलीकडे जाउन कोणी बोलत असतील तर राज्यघटनेत बदल करावा लागेल. एससी एसटीचे आरक्षण लोकसंख्येनुसारच आहे. त्यांना संविधानिक स्वरुपात त्यांना आरक्षण दिले आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना आरक्षण देणे बंधनकारक आहे. सध्या आयोग नेमलेला आहे. पण, अहवाल सादर करण्यासाठी स्वतंत्र्य आयोग नेमायचा की, मागासवर्गीय आयोगालाच अधिकार द्यायचे, या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबत बोलून निर्णय घेण्यात येईल, असेही वडेट्टीवारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT