The water of the Tembhu scheme was released into the Agrani river
The water of the Tembhu scheme was released into the Agrani river 
मुख्य बातम्या

टेंभू योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडले

टीम अॅग्रोवन

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचा भूड (ता. खानापूर) येथील पाचवा टप्पा कार्यन्वित करुन योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडले आहे. अग्रणी नही वाहती होणार असून पाझर तलाव, साठवण तलाव व बंधारे पाण्याने पूर्ण भरतील, अशी माहिती टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सूत्रांनी दिली. 

टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरु होऊन महिन्याचा कालावधी झाला आहे. केवळ मुख्य कालव्यातून पुढे पाणी जात आहे. त्यामुळे अनेक भागात योजनेचे पाणी पोहोचले नाही. परिणामी दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढते आहे.

गेल्या तीन महिन्यापासून खानापूर घाटमाथ्यावर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव कोरडे पडले होते. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी पाचवा टप्पा सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतू, पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतू, पाणी टंचाईची तीव्रता लोकप्रतिनिधींना दाखवल्यानंतर त्यांनी टेंभू योजनेचा भूड येथील पाचवा टप्पा सुरु करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या. त्यामुळे हा टप्पा सुरु करण्यात आला. 

हे पाणी बलवडीत आले असून या गावातील तीन बंधारे पाण्याने भरले आहेत. त्यानंतर या पाण्याने येणापूर , सुलतानगादे, करंजे येथील अग्रणी नदीवरील सर्व बंधारे पाण्याने भरुन घेण्यात येतील. बलवडी (खा). येथील दुसऱ्या वितरिकेद्वारे खानापूर पाझर तलाव आणि सुलतानगादे साठवण तलावात पाणी सोडण्यात येईल.

त्याचबरोबर खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांतून ५५ किलोमीटर प्रवास करीत हे पाणी कर्नाटकातील अथणी तालुक्यात कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे तीनही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT