अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळा
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळा 
मुख्य बातम्या

अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळा

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक होरपळ सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात फेब्रुवारीतच हाहाकार उडू लागला आहे. विभागातील एकट्या बुलडाणा जिल्ह्यातच ६५ टँकर सुरू आहेत. गेल्या महिन्यापर्यंत या जिल्ह्यात २५ टँकर सुरू होते. फेब्रुवारी लागताच ही संख्या ४० ने वाढून ६५ झाली आहे. आणखी काही प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असल्याची माहिती मिळाली. 

या हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या सरासरीच्या ३० टक्के पाऊस कमी झाला. परिणामी याचे चटके बसायला सुरवात झाली. प्रकल्प कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटू लागले. यामुळेच आता नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव वाढले आहेत. अद्याप उन्हाळा सुरू व्हायचा आहे. आगामी चार महिन्यांत नागरिकांना पाणी कोठून द्यायचे, याचाही पेच तयार होऊ लागला आहे.  मागील वर्षी अकोला जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार उडाला. या वर्षी पाण्याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही टँकर सुरू झाला नाही.

अमरावती, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातसुद्धा पाणी समस्या तितकी तीव्र नाही. विभागात सध्या बुलडाणा जिल्हाच पाणीटंचाईत आघाडीवर आहे. १३ तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी मोठ्या प्रमाणात नळयोजनांची विशेष दुरुस्ती, हातपंप दुरुस्तीची कामे, टँकरची संख्या वाढत आहे. ६५ गावांसाठी ६५ टँकर सुरू आहेत. दर आठवड्याला ही संख्या वाढत आहे.

जनावरांचेही हाल नागरिकांचे पाण्यासाठी जसे हाल होत आहेत, तशीच बिकट समस्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची होऊ लागली आहे. जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे असल्याने येत्या काळात पाण्यासाठी भटकंतीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची यात मोठी ओढाताण होण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT