संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग कायम

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग शनिवारी (ता. ७) पुन्हा कायम होता. शनिवारीही चौथ्या दिवशी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग ३० हजार क्‍युसेकपर्यंत ठेवण्यात आला होता. दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीतही २३ हजार २०० क्‍युसेकचा विसर्ग होता. त्यामुळे भीमा नदीत ५३ हजार क्‍युसेकने पाणी मिसळत होते. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील मंदिरे पाण्याखाली गेली. तसेच भीमा नदीकाठी पूरस्थितीची शक्‍यता कायम होती. पण परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली. 

गेल्या पाच-सहा दिवसांपासून उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या या अखंड प्रवाहामुळे पुढे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी, पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेतील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. सोलापूर रस्त्याकडील जुना दगडीपूलही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यंदा महिनाभरात दुसऱ्यांदा तो पाण्याखाली गेला आहे. पण पाण्याचा प्रवाह कमी आणि नियंत्रणात असल्याने सध्या तरी कोणताच धोका नाही, तरीही नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांत उजनी धरणातून भीमा नदीत टप्प्याटप्प्याने पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येत आहे. शुक्रवारी ३० हजार क्‍युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत होते. शनिवारी (ता. ७) ते पुन्हा वाढण्याची शक्‍यता होती. पण धरणाच्या वरच्या बाजूने दौंडकडूनही २३ हजार २९० क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग कमी असल्याने पुढेही कमीच विसर्ग ठेवण्यात आला आहे. शनिवारी भीमा नदीतील विसर्ग ३० हजार क्‍युसेकपर्यंत होता. त्याशिवाय वीर धरणातूनही नीरेमध्ये शनिवारी २३ हजार २०० क्‍युसेक इतका विसर्ग सुरू होता. त्यामुळे हे पाणीही भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदीमध्ये जवळपास ५३ हजार २०० क्‍युसेक इतके एकूण पाणी मिसळत होते. त्यामुळे पूरस्थिती असली, तरी नियंत्रणात होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT