The water of Mhasal scheme reached at Dafalpur 
मुख्य बातम्या

म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापूरमध्ये पोहोचले

डफळापूर, जि. सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनातून पंप सुरू केल्याने योजनेचे पाणी जत तालुक्यात डफळापुरला पोचले आहे. या योजनेच्या म्हैसाळ येथील पंपामधून टप्प्या टप्प्याने पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असून तलावात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोडत आहेत.

टीम अॅग्रोवन

डफळापूर, जि. सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनातून पंप सुरू केल्याने योजनेचे पाणी जत तालुक्यात डफळापुरला पोचले आहे. या योजनेच्या म्हैसाळ येथील पंपामधून टप्प्या टप्प्याने पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असून तलावात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोडत आहेत.

तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. शेतीला व पिण्याचे पाणी टंचाई तीव्र होत आहे. गेल्यावर्षी तालुक्यात फक्त २१७ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्या जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. सध्या वाड्या-वस्त्यांवरील विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठले आहेत. शासनाने आत्तापासून पाण्याचे नियोजन केले पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अजून पूर्ण तालुका कोरडाच आहे.

डफळापूर तलाव ५० दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. त्यामध्ये २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाणी सोडणार आहेत. डोर्ली मुख्य कालव्यातून पोट कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. डोर्ली ते डफळापूर कालव्याचे अंतर सुमारे १५ किलोमीटरचे आहे. या कालव्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, शेततळी आहेत. 

काही शेतकऱ्यांनी विनापरवाना मोटारी टाकून पाणी उपसा करत आहेत. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुढे येत आहे. पैसे भरून तलावातून पाणी घेणार आहेत त्यांनी पाणी वाया घालवू नये. मोकळ्या शेतात, पडक्या विहिरीत इतर ठिकाणी पाणी सोडू नये, असे निदर्शनास आले तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येईल. मात्र, मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल.

कालव्यातून पाणी उपसा करण्यासाठी बेकायदेशीर मोटारी टाकल्यास त्या जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - रमेश खरात, पाटबंधारे अधिकारी, जत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT