धरण
धरण  
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील वागदर्डी धरण चार वर्षांनंतर 'ओव्हरफ्लो'

टीम अॅग्रोवन

नाशिक : मागील महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे तब्बल ४ वर्षांनंतर वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या धरण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे चालू वर्षी शेतकरी व स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. मनमाड शहराला पाणीटंचाईचा सामना दरवर्षी करावा लागतो. शहरातील नागरिकांना कधी ८ तर कधी २० दिवसांनंतर पाणी मिळते. गेल्या उन्हाळ्यात तर धरण कोरडे पडल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. मात्र, यंदा पावसामुळे धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले. याआधी २०१५ मध्ये धरण पूर्ण भरले. त्यानंतर तब्बल ४ वर्षांनंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र, आता धरण भरल्याने मनमाडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच, आता खरिपानंतर रब्बीसाठी पिकांना मोठा आधार होणार आहे, त्यामुळे येथील शेतकरीसुद्धा सुखावला आहे. जिल्हाभर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यामुळे जवळपास सर्वच छोटे-मोठे बंधारे व धरणे तुडुंब भरली. तर दुसरीकडे मात्र मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या वागदर्डी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यामुळे धरणात पाणी पाहिजे तेवढे पाणी आले नव्हते. मात्र, झालेल्या पावसाने सलग जोरदार हजेरी लावल्यामुळे वागदर्डी धरण केवळ पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होऊन झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT