fertilizer  
मुख्य बातम्या

खते खरेदी करताना ‘ओटीपी’चा वापर करा 

खते खरेदी करताना बायोमेट्रिकचा वापर केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून केंद्रीय मंत्रालयाने खत खरेदी करताना आता बायोमेट्रिकऐवजी ‘ओटीपी’चा पर्याय शेतकऱ्यांना दिला आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: खते खरेदी करताना बायोमेट्रिकचा वापर केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून केंद्रीय मंत्रालयाने खत खरेदी करताना आता बायोमेट्रिकऐवजी ‘ओटीपी’चा पर्याय शेतकऱ्यांना दिला आहे. खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात गर्दी होऊ लागली आहे. याचा परिणाम कोरोना वाढण्यात होऊ नये यासाठी केंद्रीय खत मंत्रालयाने या सूचना जारी केल्या आहेत.  देशात सुमारे साडेनऊ कोटीहून अधिक शेतकरी तीन लाख कृषी सेवा केंद्रांतून खताची खरेदी करतात. केंद्र सरकारच्या रसायने व खते मंत्रालयाच्या वतीने खत खरेदी विक्रीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी २०१६ पासून थेट निधी हस्तांतरण योजना (डीबीटी) राबविली जाते आहे. त्यासाठी देशातील तीन लाख खत विक्री दुकानांमध्ये पॉस मशिनद्वारे खत विक्री बंधनकारक केली आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला आधार बायोमेट्रिक करावा लागतो. त्यानंतरच खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होते.  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बायोमेट्रिक करण्यास शेतकरी नकार देत आहेत. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने आधार बायोमेट्रिकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली आहे. ज्या शेतकऱ्यांना बायोमेट्रिक करावयाचे नाही त्या शेतकऱ्यांनी आधार ओटीपी या पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करून रासायनिक खत खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत, असे केंद्र शासनाने सर्व राज्यांना कळविले आहे. सप्टेंबर २०२० पासून ही सुविधा सुरू केली आहे. त्याचा वापर विक्रेत्यांनी जास्तीत जास्त करावा असे खत मंत्रालयाने म्हटले आहे.  नंबर आधारशी जोडावा  बायोमेट्रिक करावयाचे नाही ते शेतकरी आधार ओटीपीचा पर्याय वापरू शकतात. बायोमेट्रिक व ओटीपी हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ओटीपी पर्याय प्रसंगी शेतकऱ्याचा मोबाईल सोबत असणे गरजेचे आहे. आधार कार्डसोबत जो मोबाईल क्रमांक जोडलेला आहे त्याच नंबरवर ओटीपी येणार आहे. जे शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत मोबाईल जोडलेला नाही त्यांनी तो प्रथम जोडणे गरजेचे आहे. त्यानंतरच ओटीपी हा पर्याय वापरावा लागेल.  प्रतिक्रिया  सध्या खरिपाचा हंगाम वेगात सुरू आहे खताची मागणी वाढत आहे. नेटवर्कच्या अडचणीमुळे ओटीपी लवकर येण्यास अडथळे निर्माण होत आहेत. सर्व्हरमध्ये गतिमानता आणल्यास सद्यपरिस्थितीत ओटीपीचा पर्याय चांगला होईल.  - संतोष कुंभार, कृषी सेवा केंद्र चालक, मलकापूर, जि. कोल्हापूर 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT