The unseasonal rains hit the next day as well
The unseasonal rains hit the next day as well 
मुख्य बातम्या

पूर्वमोसमी पावसाचा दुसऱ्या दिवशीही दणका 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. रविवारी (ता. ११) सायंकाळी अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, नगर, जळगाव, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पाऊस झाला. तर दुसऱ्या दिवशीही काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने चांगलाच दणका दिला आहे. तुरळक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिट झाल्याने पिकांच्या नुकसानीत वाढ होऊ लागली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी पावसाने नुकसान झाले. तसेच वीज पडून एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारीही पुणे शहराच्या पूर्व भागात वादळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगलीच चिंता वाढली होती. 

सांगली शहरात व जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड ते पावणेदोन तास पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांच्या काढणी, मळणीच्या कामात अडथळे येत आहेत. काही ठिकाणी गारपिट झाल्याने कांदा, ज्वारी, गहू, आंबा, द्राक्षे पिकांच्या नुकसानीत भर पडत आहे. 

नाशिकमधील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत अवकाळी पावसामुळे कांदा विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. मालेगाव परिसरातही हलक्या सरी बरसल्या. जळगाव जिल्ह्यातही अनेक भागात तुरळक सरी पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. पुणे, नगर या भागातही काही प्रमाणात अंशत ढगाळ वातावरण होते.  सिंधुदूर्ग जिल्ह्यात रात्री साडेनऊ वाजता विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस झाला. कणकवली, वैभववाडी, कुडाळच्या पूर्वपट्यात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे काही प्रमाणात आंबा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. 

सोमवारी दिवसभर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. रायगड, पालघर, मुंबई परिसरात काहीसा उन्हाचा चटका होता. औरंगाबाद जिल्ह्यातील चापानेर (ता. कन्नड) सह परिसरात ढगांचा गडगडाट आणि विजा चमकत होत्या. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस होता. यामुळे कांदे, कांदा बियाणे, गहू इतर पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाल्याने बळिराजा पुन्हा संकटात येत आहे. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 

विदर्भातील अनेक भागात दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला झाला आहे. अमरावती जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने अकोट, तेल्हारा तालुक्यातील काही गावात हलका पाऊस पडला. दिवसभर वातवरणातील उष्मा काहीसा कमी झाल्याने तापमान काहीसे कमी झालेले जाणवत होते. इतर जिल्ह्यांतही ढगाळ व काहीसे ऊन अशी स्थिती होती. 

सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
मंडळ झालेला पाऊस
महाबळेश्वर १.०
मालेगाव ७.०
सांगली २६.८
उस्मानाबाद २.२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export : साखर निर्यातीचे वास्तव

Loksabha Election 2024 : पुणे, शिरूर, मावळसाठी आज होणार मतदान

Violation of Code of Conduct : आचारसंहिता भंगाच्या दीड हजार तक्रारींवर कारवाई

Summer Heat : उन्हामुळे केळी, भाजीपाल्याला फटका

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT