spraying_1.jpg 
मुख्य बातम्या

अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; शेतकऱ्यांस ३ लाखांचा फटका 

तळवेल (ता. भुसावळ) येथील शेतकरी रामा फेगडे यांनी आपल्या शेतात कांद्याचे बीज रोपण केले होते. मात्र अज्ञात माथेफिरूने रात्री या पिकावर विषारी तणनाशक औषध फवारल्यामुळे पूर्ण कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

टीम अॅग्रोवन

भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील शेतकरी रामा फेगडे यांनी आपल्या शेतात कांद्याचे बीज रोपण केले होते. मात्र अज्ञात माथेफिरूने रात्री या पिकावर विषारी तणनाशक औषध फवारल्यामुळे पूर्ण कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. 

रामा फेगडे यांच्या बोहर्डी येथील शेतात गट क्रमांक १४७ मधे जमिनीत महिनाभरापूर्वी कांद्याचे बीज रोपण केले होते. येथून रोप काढून ३ एकर क्षेत्रात कांदा लागवडीची त्यांची तयारी होती. मात्र रात्री पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशकाची फवारणी केली. त्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले. याबाबत शेतकरी फेगडे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार नरसिंग चव्हाण तपास करीत आहे. 

संबंधितावर कारवाईची मागणी  या शेतातून किमान साडेतीन लाखापर्यंत कांद्याचे उत्पन्न निघण्याचा अंदाज शेतकऱ्याने व्यक्त केला. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून भरपाईची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारांना पायबंद घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT