Union Agriculture Minister to send team for pomegranate inspection 
मुख्य बातम्या

केंद्रीय कृषिमंत्री पाठवणार डाळिंब पाहणीसाठी पथक

केंद्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह नुकसान भरपाईसाठी मदत करावी, अशी मागणी खासदार डॉ. विकास महात्मे आणि मोर्फाचे अध्यक्ष कॄषिभूषण अंकुश पडवळे यांनी केंद्रीय कॄषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः राज्यातील डाळिंब क्षेत्र ‘पिन होल बोरर’ या किडीमुळे संकटात आले आहे. त्याला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह नुकसान भरपाईसाठी मदत करावी, अशी मागणी खासदार डॉ. विकास महात्मे आणि मोर्फाचे अध्यक्ष कॄषिभूषण अंकुश पडवळे यांनी केंद्रीय कॄषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली. 

महात्मे आणि पडवळे यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे तोमर यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक मागील पाच वर्षांपासून तेलकट डाग व अतिवॄष्टीमुळे अडचणीत असताना त्यात भर म्हणून ‘पिन होल बोरर’ या किडीमुळे झाडाची मर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या समस्येमुळे बागा संपत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र या किडीमुळे संपले आहे. शास्त्रज्ञांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करूनही या किडीवर नियत्रंण मिळत नाही, असे पडवळे यांनी तोमर यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी शिष्टमंडळात रविंद्रसिह पाल, नवीशकुमार विग, राहुल खंन्ना, केदारनाथ आंनद आदी उपस्थित होते.

तज्ज्ञांचे पथक पाठवणार तोमर यांनी कॄषिसचिव संजय अग्रवाल यांना एक कॄषी संशोधकांचे केंद्रीय पथक तत्काळ पाहणी करण्यासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे व नुकसानीची तीव्रता बघून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, या बाबत विचार केला जाईल, असे आश्‍वासन तोमर यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT