Under natural disasters 272 crore insurance sanctioned 
मुख्य बातम्या

नैसर्गिक आपत्ती अंतर्गंत  २७२ कोटींची विमाभरपाई मंजूर 

खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत भरपाईस पात्र परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार १६० पैकी २ लाख ८६ हजार १२ लाभार्थी शेतकऱ्यांना २४७ कोटी रुपये पीकविम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

परभणी ः पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत भरपाईस पात्र परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार १६० पैकी २ लाख ८६ हजार १२ लाभार्थी शेतकऱ्यांना २४७ कोटी रुपये पीकविम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली.  स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत परभणी जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७८ हजार ३०७ एवढ्या शेतकऱ्यांनी विविध माध्यमातून पीकविमा कंपनीकडे नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यापैकी ३ लाख ५१ हजार १६० शेतकरी पीकविमा कंपनीने पात्र ठरवून त्यांना एकूण २७२ कोटी रुपये विमा मंजूर केला आहे. त्यापैकी बुधवारपर्यंत (ता.८) पीकविमा कंपनीने २ लाख ८६ हजार १२ शेतकऱ्यांना २४७ कोटी पीकविमा वाटप केला आहे. उर्वरीत पीकविमा वाटपाची प्रक्रिया विमा कंपनीकडून चालू आहे. नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे. त्यामध्ये नुकसानीची पूर्वसूचना दिली त्यावेळी पिकाच्या पीक वाढीची अवस्था, नुकसानीची टक्केवारी, त्या कालावधीनुसार पीकविमा वाटप होत आहे. नुकसानीची पुर्वसूचना न दिलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना पीककापणी प्रयोग आधारित महसूल मंडलनिहाय नुकसान भरपाई लागू झाल्यास पीकविमा वाटप करण्यात येईल. नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळालेला नाही, त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरात लवकर पीकविमा त्यांच्या खात्यावर जमा होईल. विमाधारक शेतकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लोखंडे यांनी केले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT