Two officers Appointment as graders for buying cotton in Ambad
Two officers Appointment as graders for buying cotton in Ambad  
मुख्य बातम्या

अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन अधिकाऱ्यांची ग्रेडर म्हणून नियुक्ती

टीम अॅग्रोवन

अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या कापूस खरेदी केंद्रावर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबईतर्फे होणाऱ्या कापूस खरेदीसाठी ग्रेडरचे प्रशिक्षण घेऊन आलेले कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सुनील गोधने व विजय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हा उपनिबंधक व कापूस पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापकाच्या केंद्रावरील संयुक्त भेटीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ही नियुक्ती केली. या केंद्रावरून राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या कापसाची शासकीय हमी भावाने खरेदी करणे प्रस्तावित आहे.

जिल्ह्यात हमी दराने सुरू असलेल्या कापूस खरेदीसाठी ग्रेडची संख्या कमी असल्यामुळे प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे केंद्रावर ग्रेडर म्हणून कृषी विभागाचे पदवीधर अधिकारी- कर्मचाऱ्यांना कापूस ग्रेडिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना केंद्रावर ग्रेडर म्हणून नियुक्त करण्याचे कळविण्यात आले होते. 

कृषी विभागाचे कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे ४ दिवसाचे प्रशिक्षण २० ते २३ मे दरम्यान पूर्ण केले आहे. अंबडचा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाची प्रतवारी करणे आणि येथे एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणे अभिप्रेत आहे. प्रशिक्षित ग्रेडरची नियुक्ती करणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती केली.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT