turmeric in Hingoli Market Committee Register for sale via mobile app 
मुख्य बातम्या

हिंगोली बाजार समितीत हळद विक्रीसाठी मोबाईल अॅपव्दारे नोंदणी

हिंगोली : राज्यातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद विक्रीसाठी ‘माय एपीएमसी’ (myapmc) या मोबाईल अॅपव्दारे शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

हिंगोली : राज्यातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद विक्रीसाठी ‘माय एपीएमसी’ (myapmc) या मोबाईल अॅपव्दारे शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. सोमवार (ता.४) पर्यंत ६३२ शेतकऱ्यांनी १८ हजार ९६३ क्विंटल हळद विक्रीसाठी नोंदणी केली. हरभरा, तूर, सोयाबीन या शेतमालाच्या विक्रीसाठी देखील या अॅपव्दारे नोंदणी करता येईल, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. बाजार समितीत हळद, हरभरा, तूर, सोयाबीन हा शेतमाल विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोबाईल अॅपव्दारे नोंदणी करावी लागेल. त्यासाठी http://myapmc.in/apmc/androidApp या लिंकव्दारे माय एपीएमसी हे ऍप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. हे अॅप ओपन केल्यानंतर त्यातील हिंगोली बाजार समितीची निवड करावी. त्यानंतर शेतकरी नोंदणी ऑप्शनला क्लिक करुन शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, गाव, शेतमाल तपशील आदी माहिती भरावी. त्यानंतर साठव्या (सेव्ह) बटनला क्लिक करावे, अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या. 

नोंदणीधारक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचा क्रम आल्यानंतर समितीव्दारे दिलेल्या मोबाईल क्रमांकवर शेतमाल आणण्यासाठी संदेश (एसएमएस) पाठविण्यात येईल. संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी वेळेतच हळद, नोंदणी केलेला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा. उशिरा येणाऱ्या शेतीमालाचे लिलाव होणार नाहीत. त्या शेतकऱ्यांना पुन्हा नोंद करून माल विक्रीसाठी आणावा लागेल. दरम्यान, बाजार समितीतील शेतमालाच्या खरेदीदार विक्रेते, हमाल, कामगारांना बाजार समितीतर्फे ओळखपत्र देण्यात आले आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT