Tribal Development Board will procure wheat
Tribal Development Board will procure wheat 
मुख्य बातम्या

आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदी

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात पहिल्यांदाच गव्हाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. शासनाने गव्हाला १९७५ रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे.

आदिवासी विकास महामंडळाने एकाधिकार आणि आधारभूत योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या शेतीमालाची खरेदी यापूर्वी केली आहे. या हंगामात पहिल्यांदाच गव्हाची आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी मंडळाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. राज्यभरात असलेले आदिवासी सोसायटीच्या माध्यमातून खरेदी केली जाईल. राज्यात जवळपास नऊशे आदिवासी सोसायटी आहेत. मात्र खरेदी केलेला गहू ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात आधारभूत दराने खरेदी केली जाणार आहे.

आदिवासी सोसायटीअंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या गहू महामंडळ खरेदी करणार आहे. शेतीमाल ठेवण्यासाठी जागेची उपलब्धता असेल अशा ठिकाणी खरेदी करून दिवसभरात आलेला माल लगेच शासनाला सुपूर्द केले जाणार आहे. शक्य असेल त्या ठिकाणी एक आदिवासी सोसायटीच्या माध्यमातून लगतच्या दोन, तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या गहू खरेदी केला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात कळंब खरेदी केंद्रावर राळेगाव आणि कळंब तालुक्यातील गव्हाची खरेदी होणार आहे. सद्यःस्थितीत आदिवासी बहुल भागातील काही ठिकाणच्या आदिवासी सोसायट्यांना गहू खरेदी साठी जागा उपलब्ध झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात लोहारा आणि नांदारा दोन आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीअंतर्गत गावातून वीस ते पंचवीस हजार क्विंटल गहू खरेदीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने आदिवासी विकास महामंडळाला खरेदीसाठी जागेची उपलब्धता करून दिली. त्यामुळे जिल्ह्यात तत्काळ गव्हाची खरेदी शक्य झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT