कचरेवाडी येथे सोलर ड्रायर वापराविषयी प्रशिक्षण कार्यक्रम
कचरेवाडी येथे सोलर ड्रायर वापराविषयी प्रशिक्षण कार्यक्रम 
मुख्य बातम्या

कचरेवाडी येथे सोलर ड्रायर वापराविषयी प्रशिक्षण कार्यक्रम

टीम अॅग्रोवन

जालना : कृषी विज्ञान केंद्र जालनाअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी महिलांसाठी ‘सोलर ड्रायरचा वापर करून फळे व भाजीपाला सुकवणी’ या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन कचरेवाडी येथे नुकतेच करण्यात आले होते. 

या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना सोलर ड्रायर उपयोगाविषयी माहिती देण्यात आली. सोलर ड्रायरमध्ये भाज्या वाळविणे या पद्धतीत भाज्यातील पाण्याचा अंश बाष्पीभवनाद्वारे काढून टाकला जातो व ते एक वर्षापर्यंत पदार्थ टिकतो, असे अन्न तंत्र विभागाचे तज्ज्ञ शशिकांत पाटील यांनी समजावून सांगितले.

या वेळी त्यांनी कांदा, कोबी, लसूण व पालक या सारख्या पदार्थांचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. या प्रशिक्षण कार्यक्रमात गावच्या सरपंच सुभद्रा गणेश जाधव तसेच गावातील महिलांनी सहभाग नोंदवला. साध्या, सोप्या व कमी खर्चाच्या पद्धतींनी भाज्या वाळवून आपल्याला सोलर ड्रायर वापर करून आर्थिक उन्नती करावी, असे मत शशिकांत पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

SCROLL FOR NEXT