चाकरमान्यांना शेतीपूरक उद्योगांचे प्रशिक्षण Training of agri-industries to the servants 
मुख्य बातम्या

अकोल्याचा प्रीमियम १३८ कोटी, पीकविमा मिळाला ७७.९० कोटी

ल्या खरीप हंगामासाठी पीकविमा मंजूर झाला आहे. जिल्ह्यासाठी शेतकरी व शासनाने भरलेल्या १३८ कोटी रुपयांच्या प्रिमियमच्या तुलनेत केवळ ७७.९० कोटी रुपये पीकविमा म्हणून शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

टीम अॅग्रोवन

अकोला : गेल्या खरीप हंगामासाठी पीकविमा मंजूर झाला आहे. जिल्ह्यासाठी शेतकरी व शासनाने भरलेल्या १३८ कोटी रुपयांच्या प्रिमियमच्या तुलनेत केवळ ७७.९० कोटी रुपये पीकविमा म्हणून शेतकऱ्यांना मिळाले आहेत. यातही प्रामुख्याने सोयाबीनसारखे सर्वाधिक क्षेत्रावर पेरल्या जाणारे पीकच सार्वत्रिक नुकसानास पात्र ठरविण्यात न आल्याने रोष तयार झाला आहे. विमा कंपनीला लोकप्रतिनिधी जाब विचारू लागले आहेत. गेल्या हंगामात जिल्ह्यातील २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी २ लाख १७ हजार क्षेत्राचा विमा काढला होता. पीक कापणीच्या काळात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. उत्पादित मालाचा दर्जा घसरला होता. त्यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले. तर हंगामात सुरुवातीलाच मूग पीक रोगाच्या प्रकोपाने १०० टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. या आपत्तीमुळे यंदा पुरेशी नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा आता मदत जाहीर झाली त्यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. सोयाबीन पिकासाठी केवळ २ कोटी १९ लाख रुपये मदत जाहीर झाली आहे. हे शेतकरी सुद्धा एका तालुक्यातील एकाच महसूल मंडळातील आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५१ महसूल मंडळात एकही रुपया भरपाई देण्यात आलेली नाही. मागील वर्षात जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी पावणेदहा क्विंटल तर या वर्षी हेक्टरी १२ क्विंटल दाखविण्यात आली आहे. उंबरठा उत्पन्नाच्या आधारे विमा मिळाला नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. जिल्ह्यातील २ कोटी ६३ लाख शेतकऱ्यांनी विमा प्रिमियमपोटी १८ कोटी ४८ लाख रुपये भरले होते. यापैकी १ लाख ३ हजार ४३१ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. तर १ लाख ६० हजार शेतकरी भरपाईपासून दूर आहेत.  

प्रतिक्रिया गेल्या हंगामात सोयाबीन पिकाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले होते. काही भागात दुबार-तिबार पेरणी करावी लागली. काही दिवसांनी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघाला नाही. असे असताना कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. वास्तविक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात यंदा अपेक्षात होती. परंतु सर्वाधिक नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याचा लाभ द्यावा अन्यथा भारत कृषक समाज कायदेशीर लढाई लढेल. - डॉ. प्रकाश मानकर,  चेअरमन, भारत कृषक समाज, महाराष्ट्र

  • अकोला जिल्ह्याला मंजूर पीकविमा    ७७.९० कोटी
  • शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम    १८.४८ कोटी
  • राज्य सरकारचा वाटा    ६०.१० कोटी
  • केंद्र सरकारचा वाटा    ६०.१० कोटी
  • शेतकरी संख्या    २ लाख ६३ हजार ९९३
  • लाभार्थी    १ लाख ३ हजार ४३१
  • पीकविमा क्षेत्र    २ लाख १४ हजार ४५६ हेक्टर
  • पिकनिहाय विमा    

  • मूग    ४०.६९ कोटी
  • उडीद    ९.२३ कोटी
  • कापूस    ४.९ कोटी 
  • तूर    १९.४७ कोटी
  • सोयाबीन    २.१९ कोटी
  • ज्वारी    २. २० कोटी
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

    Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

    Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

    Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

    Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

    SCROLL FOR NEXT