Tomorrow's agitation at the door of the revenue minister
Tomorrow's agitation at the door of the revenue minister 
मुख्य बातम्या

महसूलमंत्र्यांच्या दारात उद्या आंदोलन

टीम अॅग्रोवन

नगर ः दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांमुळे शेतकऱ्यांवर असलेल्या या संकट काळामुळे त्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या वचन नाम्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याचसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घराच्या दारात संघटनेचे कार्यकर्ते शनिवारी (ता. १४) दिवाळीच्या दिवशी चटणी-भाकरी आंदोलन करणार आहेत.

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांपासून सातत्याने २०१२, २०१५, २०१६, २०१९, २०२० मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आदी बाबींमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू २०२० मुळे पिकलेला शेतीमालही कवडीमोल भावाने विकण्याची वेळी आली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे शेतीमालाला उत्पादन खर्च इतकाही दर न मिळाल्याने तोट्यात विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. गेल्या १० वर्षांपासून शेतकरी राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी, पतसंस्था आदी बँकेचे कर्ज वरील बाबींमुळे थकलेले आहे. त्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज मिळणे कठीण झालेले आहे. याचा परिणाम शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ होत आहे. जिल्हा बँकेतील थकबाकी शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठल्याही कर्जमाफीचा लाभ न झालेल्या व सेवा सोसायटीचे कित्येक वर्षांपासूनचे थकीत कर्ज राइट ऑफ न झाल्याने ७/१२ उताऱ्यावर मालक म्हणून सदरील सोसायटींच्या नोंदी लागल्या आहेत. तरी सरकारने जाहीरनाम्याच्या प्रती क्षेत्रातील, रकमेची, तारखेची थकबाकी, चालू बाकी, अशी कुठलीही न लावता सरसकट संपूर्ण कर्जमाफी करून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर किमान एकदा तरी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

अन्यथा, दीपावलीच्या दिवशी शनिवारी (ता. १४) शेतकरी बाळासाहेब थोरात यांच्या दारात चटणी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी करणार असल्याचे अनिल औताडे, युवराज जगताप, हरिभाऊ तुंवर, बाळासाहेब कदम, इंद्रभान चोरमल, बबन उघडे, नारायण पवार, अहमद शेख, भगवान जाधव यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT