कोरेगावच्या उत्तर भागात पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
कोरेगावच्या उत्तर भागात पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

कोरेगावच्या उत्तर भागात पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

पिंपोडे बुद्रुक, जि. सातारा : कोरेगावच्या उत्तर भागात गेल्या महिन्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे भागातील हजारो हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पैसे कमवून देणाऱ्या नगदी पिकांचा खरीप हंगाम वाया गेल्याची स्थिती आहे. 

भागातील घेवडा, वाटणा, सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. ही नुकसानीची रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या महिन्यापासून पडणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सखल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कोवळी पिके कुजून पिवळी पडू लागली आहेत. वसना नदीला पूर आला असून ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. 

खरीप पिकांची पेरणी झाल्यावर सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतांना तळ्याचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांनी कर्ज काढून, हात उसने, तर काहींनी दागिने गहाण ठेऊन, पशुधन विकून खरिपाच्या पेरणीसाठी भांडवल उभे केले होते. त्यातून बियाणे, खते, मशागत व पेरणीसाठी लागणारे पैसे भागवण्यासाठी जिकिर केली. सोळशी, नायगाव, नांदवळ, रणदुल्लाबाद, करंजखोप, सोनके, वाघोली, मोरबेंद, सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी, आसनगाव, दहिगाव, भावेनगर येथे घेवड्यापेक्षा वाटणा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, तडवळे, घिगेवाडी येथे घेवडा, वाटणा ही दोन्ही पिके असतात. घेवडा, वाटणा ही पिके कमी भांडवली व पैसे देणारी असल्याने शेतकरी आशावादी होते. मात्र, पावसाने त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. 

महिनाभर पडणाऱ्या पावसाने सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे. परिणामी, नुकत्याच उगवण झालेल्या पिकांचा पावसापुढे टिकाव लागणे अशक्‍य बनले. वाठार स्टेशन मंडल कृषी अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या एकूण ३१ गावांत ६९२० हेक्‍टर क्षेत्रावर घेवडा आणि २५५० हेक्‍टरवर वाटण्याची पेरणी झाल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी मोहनलाल गायकवाड यांनी सांगितले.

पाऊस न थांबल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता असून, कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीची पाहणी करून डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT