... then the damage to the grapes would have been avoided
... then the damage to the grapes would have been avoided 
मुख्य बातम्या

...तर द्राक्षाचे नुकसान टळले असते

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील पूर्वहंगामी द्राक्ष पीक काढणी अवस्थेत असताना मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काढणीयोग्य द्राक्ष मालाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, त्याकडे शासकीय दुर्लक्ष झाल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदानाच्या मागणीचा विचार झाला असता तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले नसते, अशी संतप्त भावना द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कसमादे पट्ट्यात सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यातील द्राक्ष हंगाम घेतला जातो. जवळपास ३,८०० एकरवर बागा आहेत. त्यापैकी जवळपास ४० टक्के मालाची काढणी होऊन ६० टक्के द्राक्षमाल वेलींवरच होता. त्यास सरासरी ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे दर मिळत होता. मात्र, मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात तडे जाण्याची समस्या वाढली आहे. त्यामुळे जवळपास २०० कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. 

परिणामी या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. आमचे नुकसान पाहण्यासाठी राजकीय नेते बांधावर येतात. प्रशासनाची यंत्रणा सगळे फार्स करते. मात्र, समस्येवर उपाययोजना सुचवून कार्यवाही करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयमाची पातळी संपली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांसह शासकीय यंत्रणेने दौरे केले. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पदरी काहीच न पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी आहे.

प्रतिएकरसाठी ४ लाखखर्च प्रस्तावित  प्लास्टिक पेपरसाठी एकरी २.५ ते ३ लाख, अँगल व तारा बांधणी यासाठी १ लाख असा प्रतिएकरसाठी ४ लाख खर्च प्रस्तावित आहे. तुलनेत मागणीनुसार शासनाने जर निम्मे ५० टक्के अनुदान दिल्यास मोठी मदत होऊ शकते.त्यासाठी एकरी २ लाख रुपये अनुदान दिल्यास कमसादे भागातील ३ हजार ८०० एकरवरील बागांना ७ कोटी रुपयात पुढील दहा वर्षांसाठी हा प्रश्न सुटला असता. अन्‌ गेल्या तीन वर्षात ५०० कोटींचे नुकसान झाले नसते, असे  शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT