देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या सोयाबीनची चोरी
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या सोयाबीनची चोरी 
मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या सोयाबीनची चोरी

टीम अॅग्रोवन

नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात करंजकर कुटुंबीयांच्या शेतातील बंद खोलीतून ४८ हजार ६०० रुपये किमतीचे सोयाबीन चोरी गेल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

येथील शेतकरी सोमनाथ गंगाधर कंरजकर यांनी शेतातून चार-पाच दिवसांपूर्वी सोयाबीन काढणी करून सत्तावीस गोण्यांमध्ये भरून मळ्यातील खोलीत शनिवारी (ता. १६) रात्री सात वाजेच्या दरम्यान ठेवली होते. मात्र, रविवारी (ता. १७) सकाळी रोजच्याप्रमाणे मळ्यात गेले असता मळ्यातील खोलीचा दरवाजा चौकटीसह काढलेला दिसला अन् खोलीतील ठेवलेले सोयाबीनच्या सत्तावीस गोण्या अंदाजे ४८ हजार ६०० रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला गेल्याचे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. 

चोरट्यांनी बंद खोलीचा दरवाजा तोडून शेतीमाल लंपास केला आहे. अगोदरच नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या कष्टाने सोयाबीनचे उत्पादन घेतले. विक्रीसाठी खोलीत सोयाबीन ठेवली असता चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांचा अद्याप काही सुगावा लागला नाही. याबाबत पुढील तपास सहायक उपनिरीक्षक आर. एस. जाधव करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT