Theft of native custard apple seeds 
मुख्य बातम्या

देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी

सोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी करणाऱ्या तीन संशयितांना पांगरी (ता. बार्शी) पोलिसांनी अटक केली.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी करणाऱ्या तीन संशयितांना पांगरी (ता. बार्शी) पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार कट्टे बियाण्यासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा सुमारे १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सागर आनंदराव खळदकर (वय ३१), हनुमंत साधू शिंदे (वय २७), सागर संजय झोरी (वय २६ सर्व रा. गोरमाळे ता. बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या आठवड्यात १६ एप्रिल रोजी नितीन रामेश्वर गिराम (रा. गोरमाळे, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलिसात ३२ हजार रुपये किमतीचे प्रत्येकी ४० किलो वजनाचे ४ कट्टे देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली होती. 

पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुधीर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक परबत यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता. त्यांनी तातडीने चौकशी करुन संशयितांना ताब्यात घेतले. सखोल तपासाअंती त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. चोरीच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावरच कडब्याच्या गंजीत सिताफळाच्या बियाण्याचे हे कट्टे लपवून ठेवले होते. ते पोलिसांनी जप्त केले, त्यांच्याकडील दोन मोटार सायकलीही जप्त करण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT