थंडीचा कडाका झाला कमी
थंडीचा कडाका झाला कमी 
मुख्य बातम्या

थंडीचा कडाका झाला कमी

टीम अॅग्रोवन

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली अाहे. तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. शनिवारी (ता. १२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १३) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तर किमान तापमानातही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.  राजस्थानपासून, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकदरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्राणीय स्थिती) सक्रिय असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरावरून उष्ण व दमट वारे महाराष्ट्रात येत असल्याने ढगाळ हवामानाची शक्यता अाहे. शनिवारी (ता. १२) राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८ अंश सेल्सिअस, नगर ९.१ अंश, नाशिक ९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर उर्वरित राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या पुढे गेले आहे.   शनिवारी (ता. १२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.७ (-०.७), नगर ९.१ (-२.८), कोल्हापूर १५.९ (०.६), महाबळेश्‍वर १४.२ (०.८), मालेगाव ११.० (०.२), नाशिक ९.६, सांगली १३.३ (-१.०), सातारा १२.२ (-०.७), सोलापूर १६.६ (०.१), सांताक्रूझ १५.२ (-२.१), अलिबाग १५.६ (-२.१), रत्नागिरी १६.७ (-२.६), डहाणू १३.९ (-३.३), आैरंगाबाद १२.० (-०.४), परभणी १४.५ (०.२), नांदेड १३.५ (-०.२), अकोला १४.६ (०.२), अमरावती १३.२ (-१.३), बुलडाणा १५.४ (०.८), चंद्रपूर १२.४ (-२.२), गोंदिया १०.८ (-२.४), नागपूर १०.२ (-३.२), वर्धा १३.४ (०), यवतमाळ १६.० (०.८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT