In Telangana, rice will be procured directly from the village 
मुख्य बातम्या

तेलंगणात थेट गावातच होणार भात खरेदी : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

तेलंगण राज्यात भाताची संपूर्ण खरेदी गावपातळीवर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलू आहे. मुख्यमंत्री राव म्हणाले,‘‘कोरोनाची भीती अद्यापही कायम आहे. यामुळे भात खरेदीसाठी सर्व संबंधित सरकारी संस्थांना गावपातळीवर पाठविण्यात येणार आहे.’’

टीम अॅग्रोवन

हैदराबाद : तेलंगण राज्यात भाताची संपूर्ण खरेदी गावपातळीवर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलू आहे. मुख्यमंत्री राव म्हणाले,‘‘कोरोनाची भीती अद्यापही कायम आहे. यामुळे भात खरेदीसाठी सर्व संबंधित सरकारी संस्थांना गावपातळीवर पाठविण्यात येणार आहे.’’

मुख्यमंत्री राव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रगतीभवन येथे बुधवारी (ता.७) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री राव म्हणाले,‘‘कोरोनास्थितीत ज्यापद्धतीने सरकारी यंत्रणेने गावपातळीवर काम केले, तसेच काम भात खरेदी करावे. सरकारी संस्थांनी थेट शेतकऱ्यांकडे जाऊन भात खरेदी करावी. शेतकऱ्यांनीही त्रास करून घेऊ नये, भात विक्रीसाठी त्यांनी बाजारात येण्याची गरज नाही.’’ किमान १७ टक्के आद्रता असलेला ‘अ’ दर्जाचा भात १८८८ रुपये आणि ‘ब’ दर्जाचा भात १८६८ प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी केला जाईल, असे मुख्यमंत्री राव यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, की महिनाभरातील १५ दिवस गावांमधील भात काढणी पूर्ण होईल. कृषी, पणन आणि सार्वजनिक विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात काळजी घेऊन काम करावे. एकूण किती प्रमाणात भाताची खरेदी होईल याची माहिती संकलित करून अहवाल तयार करण्याच्या आणि शेतकऱ्यांनी भात विक्रीनंतर तत्काळ पैसे मिळतील यासाठीच्या सूचना मुख्यमंत्री राव यांनी दिल्या. तेलंगणा गतीने कृषिप्रधान राज्य म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने सार्वजनिक वितरण विभागाने स्वत: सक्षम होणे अपेक्षित आहे. याकरिताचा कृती आराखडा तयार करावा. राज्यातील तूर उत्पादनाचे उद्दिष्ट पार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT