दिनायतपूर येथील बद्रिनाथ पाचोडे यांच्या शेतातील मोसंबीच्या पिकात झालेली फळगळ.
दिनायतपूर येथील बद्रिनाथ पाचोडे यांच्या शेतातील मोसंबीच्या पिकात झालेली फळगळ. 
मुख्य बातम्या

मोसंबी उत्पादक फळगळीने मेटाकुटीला

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वांत महत्त्वाचे फळपीक म्हणून मोसंबीची ओळख; परंतु या मोसंबीच्या कच्च्या फळांची प्रचंड प्रमाणात होत असलेली फळगळ उत्पादकांना तोट्यात ढकलत आहे. शिवाय दरातही झालेली घसरण शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी ठरली असून, उपाय करूनही फळगळ का होत आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून तज्ज्ञ याविषयी मार्गदर्शन करतील का, असा प्रश्न मोसंबी उत्पादक उपस्थित करीत आहेत.  यंदाच्या आंबे बहरातील मोसंबीवर फळगळीचे संकट घोंगावते आहे. सुरवातीला ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली ही फळगळ आता काही बागांमध्ये ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत गेली आहे. मराठवाड्यातील मोसंबीच्या ४६ हजार ५२२ हेक्‍टरवर विस्तारलेल्या क्षेत्रात औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतच सर्वाधिक क्षेत्र आहे. यंदा मोसंबीचा आंबे बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोसंबीत फळगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पैठण तालुक्‍यातील रहागाव, पाचलगाव, वाहेगाव, कातपूर, नारायणगाव, मुधळवाडी आदी गावांतील मोसंबी बागांमध्ये गळीचे प्रमाण प्रचंड असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. डोळ्यांदेखत बागेचे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले आहे. 

शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलेली स्थिती... काही शेतकऱ्यांच्या पाहणीनुसार लिंबासारख फळ झालं की देठ कुजायला सुरवात होते. पाठीमाग देठ फुगतं, फुगून फळ गळ होते. त्याला काळ्या रंगाचा चट्टा पडतो. तोडायला आलेली फळे गळत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या बागांत हिरवं असलेलं मोसंबीचं देठ वाळून जात आहे.   तज्ज्ञांनी पाहणी करण्याची गरज प्रत्येक वर्षी होणाऱ्या फळगळीने यंदा मर्यादा ओलांडल्याचे शेतकरी सांगताहेत. त्यामुळे ही गळ का होते आहे, याची पाहणी करून किमान पुढील बहरात हा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तज्ज्ञांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना शेतकऱ्यांना सुचविणे गरजेचे आहे.  प्रतिक्रिया मागच्या वर्षी पाच दहा टक्‍क्‍यांपर्यंत असलेली फळगळ यंदा चार एकरांतील मोसंबीत जवळपास ५० टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे. बागेला पाण्याची कमतरता नाही. सुचविलेले, माहिती असलेले सर्व उपाय करूनही फळगळ थांबण्याचे नाव नाही. दरही पाडून मागीतल्या जात असल्याने नुकसानीत भर पडते आहे. तज्ज्ञांनी पाहणी करूनच उपाय सुचवायला हवं,  - प्रल्हादराव गलधर, रहाटगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

गळ का होते तेच कळेना. तज्ज्ञांनी उपाय सुचवायला हवे. माझ्या बागेत ४० ते ५० टक्‍के फळगळ झालीय.  - महादेव तारगे, मोसंबी उत्पादक, घनसावंगी 

हार्वेस्टिंगला येण्याआधीच फळांची गळ होते आहे. दहा एकर मोसंबीपैकी चार एकरांतील फळगळ ५० टक्‍क्‍यांच्या पुढे आहे.  - बद्रिनाथ पाचोडे, दिनायतपूर, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT