Swabhimani avoided hitting the MSEDCL headquarters
Swabhimani avoided hitting the MSEDCL headquarters 
मुख्य बातम्या

सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘स्वाभिमानी'ने ठोकले टाळे

टीम अॅग्रोवन

सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोलापुरात मंगळवारी (ता.२७) महावितरण मुख्यालयाला टाळे ठोकले. 

ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार  राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात राज्यभर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून सोलापुरातही हे आंदोलन झाले. 

‘स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल, तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी सचिन पाटील, अजित बोरकर, इक्‍बाल मुजावर, रणजित बागल, सदाशिव  वाघमोडे, सचिन मस्के, कांतीलाल नाईकनवरे, तुकाराम शेतसंदी, समाधान काळे, राम शेट्टी आदी उपस्थित होते. 

पटेल म्हणाले, ‘‘सरकारने आमच्या मागण्यांबाबत विचार करावा, शेतकरी आधीच खचला आहे. त्यात पाऊस आणि पूरस्थितीच्या नैसर्गिक आपत्तीने भर टाकली आहे.  त्यामुळे संपूर्ण वीजबिल माफी आवश्‍यक आहे.''  रणदिवे म्हणाले, ‘‘सरकारने वीजबिल माफ केले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT