कांदा आवक ७५ टक्के मंदावली
कांदा आवक ७५ टक्के मंदावली 
मुख्य बातम्या

कांदा आवक ७५ टक्के मंदावली

टीम अॅग्रोवन

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यात व साठवणूक मर्यादा घातल्याचा मोठा परिणाम कांदा आवकेवर झाला आहे. निर्णयापूर्वीच्या आणि सध्याच्या कांदा आवकेत सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बाहेर समित्यांमधील लिलावातून ही माहिती समोर आली आहे. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणत: दहा ते बारा हजार क्विंटलची आवक या होत असते. मात्र, कांद्याची आवक घटत आहे. कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लासलगावला कांद्याची आवक ९५०० क्विंटल झाली होती. शुक्रवारी (ता. ४)पर्यंतच्या लिलावात कांद्याची आवक सरासरी २३०० ते २५०० क्विंटल पर्यंत झाली. दैनंदिन आवक ७० ते ७५ टक्क्यांनी घटली आहे. 

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सोमवार (ता. ३०) रोजी कांद्याची आवक ८७०१ क्विंटल झाली होती. तीच शनिवारी (ता. ५) २६११ क्विंटल झाली. शेवटच्या टप्प्यातील जो काही शिल्लक कांदा आहे, तो कळवण, बागलाण व देवळा तालुक्यांतील अधिक आहे. मात्र, अशीच जर आवक घटत राहिली तर कांद्याच्या मागणीनुसार पुरवठा होण्यात मोठी अडचण येणार आहे.

खरिपातील नवीन कांदा बाजारात येण्यास अजून १ महिन्याचा कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाने कांदा निर्यात व साठवणुकीबाबत निर्बंधामुळे ही स्थितीनिर्माण झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.  

दररोजचा आढावा घेतला जातोय जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकरी संघटनेमार्फत आजपासून (ता. ७) पासून कामकाम होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कांद्याबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमार्फत व्यापाऱ्यांकडून रोज होणाऱ्या खरेदी-विक्रीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT