संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर आडसाली ऊस लागवड

टीम अॅग्रोवन

पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत पावसाचा टप्प्याटप्प्याने चांगलाच खंड पडला. पुरेशा पावसाअभावी पुणे विभागात ऊस लागवडी खोळंबल्याचे चित्र दिसून येत आहे. विभागात आत्तापर्यंत आडसाली उसाची ७३ हजार ७४० हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  आता पावसाची आशा धूसर असल्याने चालू वर्षी पुरेशा पावसाअभावी ऊस लागवडीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.  

यंदा विभागातील पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, डिंभे, पवना आदी काही धरणे शंभर टक्के भरली. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले उजनी धरणही शंभर टक्के भरले आहे. नगर जिल्ह्यातील भंडरदरा, निळवंडे ही धरणे भरून वाहिली. मुळा धरणात ७५ टक्क्यांहून अधिक भरले आहे. यामुळे बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले आहे.

बहुतांशी शेतकरी दरवर्षी ऊस लागवड करतात. यंदा जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात पावसाचा चांगलाच खंड पडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाएेवजी सोयाबीन, तूर, मूग आदी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. त्यामुळे ऊस लागवडीत घट झाल्याचे चित्र आहे. चांगला पाऊस झाल्यास या कालावधीत एक लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होते. सुरवातीच्या काळात कमी झालेल्या पावसामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाल्याची स्थिती आहे.

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत ऊस लागवड करतात. पुणे विभागात ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र तीन लाख ७३ हजार १२९ हेक्टर आहे. विभागातील नगर जिल्ह्यातील शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पाथर्डी, राहाता या तालुक्यांत बऱ्यापैकी लागवड झाली आहे. पुणे जिल्ह्यातील  शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, पुरंदर या तालुक्यांत ऊस लागवड झाली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, खेड, आंबेगाव या तालुक्यांत अजूनही ऊस लागवड झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत ऊस लागवड झाली आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, सांगोला हे तालुके ऊस लागवडीपासून दूर असल्याचे चित्र आहे.  

जिल्हानिहाय आडसाली उसाची झालेली लागवड (क्षेत्र, हेक्टरमध्ये)
जिल्हा  सरासरी क्षेत्र आडसाली ऊस लागवड
नगर  १,०४,३३७  ३३,१३०
पुणे  १,२४,७५१ २७,४५०
सोलापूर  १,४४,०४१ १३,१६०
एकूण  ३,७३,१२९  ७३,७४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT