हवाई अंतराची अट रद्द करण्यासाठी ऊस परिषद
हवाई अंतराची अट रद्द करण्यासाठी ऊस परिषद 
मुख्य बातम्या

हवाई अंतराची अट रद्द करण्यासाठी ऊस परिषद

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकऱ्यांची होणारी अमानूष लूट थांबविण्यासाठी दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करण्याची गरज आहे. ही अट सरकारने काढण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील दिंद्रुड येथे ३० ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे असतील. या वेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी महिला आघाडीचे अध्यक्ष विमल आकनगिरे, शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष रामेश्‍वर गाडे, ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे प्रमुख बंडू सोळंके, विदर्भ प्रमुख धनंजय काकडे पाटील, मराठी कवी लेखक संघटनेचे अध्यक्ष दिनकर दाभाडे, बीडचे जिल्हाध्यक्ष अनुरथ काशीद, अजिमोद्दिन शेख, सुभाष मायकर, केशव फपाळ, राधाकिशन गडदे, जालिंदर देशमुख, अब्दुल फता पटेल आदी उपस्थित राहणार आहेत.

याबाबत श्री. नांदखिले म्हणाले, की २०१३ मध्ये झालेल्या ऊस आंदोलनात चंद्रकांत नलवडे आणि कुंडलिक कोकाटे यांच्या बलिदानानंतर साखर कारखानदारीतील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता संपविण्यासाठी डॉ. सी. रंगराजन समितीने दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करावी अशी महत्त्वाची शिफारस केली. दुर्दैवाने महाराष्ट्रातील साखर सम्राटांच्या सरकारने याऊलट भूमिका घेतली. दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट १५ किलोमीटरवरून २५ किलोमीटर केली. परिणामी, नवीन साखर कारखाने उभारणी ठप्प झाली. उसाचे दर सातत्याने कमी करण्यात साखर सम्राट यशस्वी झाले. एफआरपीचा कायदा म्हणजे शेतकऱ्यांना लुटण्याचा खुला परवाना झाला आहे. त्यामुळे कारखानादारांमध्ये स्पर्धा होण्याची गरज आहे. त्यासाठी हवाई अंतराची अट काढणे गरजेचे आहे. त्यासाठी ही ऊस परिषद आयोजित केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT