Shekhar gaikwad  
मुख्य बातम्या

इथेनॉलमुळे ऊस, साखरेला दर मिळेल : शेखर गायकवाड

राज्यात यंदा ११० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार असून, यामुळे उसाला व साखरेला चांगला भाव मिळेल, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

शिराढोण, जि. उस्मानाबाद ः राज्यात यंदा ११० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार असून, यामुळे उसाला व साखरेला चांगला भाव मिळेल, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

नॅचरल उद्योग समूहाच्या वतीने ऊस खोडवा व्यवस्थापन व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‍घाटन बुधवारी (ता. १७) आवाड शिरपुरा येथील कृषी भूषण पांडुरंग आवाड यांच्या शेतात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. तर प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्र दराडे, प्रादेशिक सहसंचालक (साखर) बी. एल. वांगी, कृषी विशेषज्ञ अरुण देशमुख, संचालक अनिल ठोंबरे, पांडुरंग आवाड उपस्थित होते. 

साखर आयुक्त म्हणाले, की ब्राझीलच्या धरतीवर राज्यात १० लाख टन साखर उत्पादन कमी करून या वर्षी ११० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार असल्याने उसाला तसेच साखरेस चांगला भाव मिळेल. मागील वर्षी इथेनॉलचे १८ कोटी लिटर उत्पादन झाले होते. शेतकऱ्यांतील आपसांतील संवाद संपल्याने आत्महत्या वाढल्याची खंत गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केली. भूगर्भातील पाण्याचा भरमसाट उपसा होत असल्याने हा विषय भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

अरुण देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांनी उसाला ठिबक सिंचनद्वारेच पाण्याचे नियोजन करून उत्पादन वाढवायला हवे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पांडुरंग आवाड यांनी केले. तर प्रवर्तक दिलीपराव भिसे यांनी आभार मानले.  लागवड मर्यादा असावी  बी. बी. ठोंबरे म्हणाले, की शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा असावी. जेणेकरून कमी क्षेत्रात जादा उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा राहील आणि आर्थिक उत्पन्न वाढेल. यासाठी शासनस्तरावर नियमावली होणे गरजेचे आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT