Submit a proposal for MGNREGA: Mundavare
Submit a proposal for MGNREGA: Mundavare 
मुख्य बातम्या

‘मनरेगा’साठी प्रस्ताव सादर करा : मुंडावरे

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘लोकांचे जीवनमान उंचविण्याबरोबरच ग्रामसमृध्दीसाठी सेवाभावी संस्थांची अखर्चिक भागीदारी बाबत निवडीचे निकष निश्चित करण्यात आले. स्वयंसेवी संस्थांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सहभागी होण्यासाठी २२ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावेत’’, असे आवाहन रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी  केले.

शासनाच्या १३ जानेवारी २०२१च्या परिपत्रकानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जलसंवर्धन व पाणलोटची कामे, वृक्ष लागवड, सुक्ष्म व लघु सिंचनासहित कालव्यांचे सिंचन सुविधा, फलोत्पादन लागवड, शेती बंधारे विकास, गाळ काढण्यासह पारंपारिक जलवाहिन्यांची दुरुस्ती नूतनीकरण, जमिनीचे विकसन, पुर नियंत्रण व पुरापासून संरक्षणात्मक कामे, ग्रामीण संधानता, सिमेंट काँक्रिट रस्ते, रेती, रस्ते, शेती व पशुपालनाशी संबंधित अशी २७५ प्रकारची कामे ही राज्याच्या इतर योजनांच्या अभिसरणातून करण्यात येतात. 

सेवाभावी संस्था भागीदारीने माहिती, प्रशिक्षण व संवाद, तांत्रिक सहायता, सामुदायिक मालकी, आपत्ती व्यवस्थापन, ‘मनरेगा’तील संस्थांच्या सहभागासाठी शासन परिपत्रकातील अटी शर्तीनुसार प्रस्ताव सादर करावे. स्वयंसेवी संस्थाची विना आर्थिक सहाय्याचे काम करण्याची तयारी असावी, शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा, जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य असेल, असेही मुंडावरे यांनी सांगितले. 

  अशी आहे नोंदणी पद्धत

स्वयंसेवी संस्थांचे जिल्ह्यात प्रशासकीय संघटन असणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था नीती आयोगाच्या NGO-PS Module वर नोंदणी असावी. इच्छुक संस्थानी त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत, असे मुंडावरे यांनी कळविले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT