Students flower garden in plastic bottles 
मुख्य बातम्या

प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये विद्यार्थ्यांनी फुलविली परसबाग

प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो. त्या पार्श्‍वभूमीवर चिमुकल्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्लॅस्टिक बाटल्यांचा उपयोग करीत परसबाग फुलविली.

टीम अॅग्रोवन

वर्धा : प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो. त्या पार्श्‍वभूमीवर चिमुकल्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्लॅस्टिक बाटल्यांचा उपयोग करीत परसबाग फुलविली. मगन संग्रहालयाच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.  ‘प्लॅस्टिक निर्मूलन व नियंत्रित वापरा करता’ शासकीय पातळीवर अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. परंतु त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर वाढीस लागला आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये प्लॅस्टिक साचून नाल्या तुंबण्याचे प्रकार घडतात. गाईच्या पोटातदेखील प्लॅस्टिक गेल्याने अनेक गाईंचा मृत्यू झाल्याचे प्रकार ग्रामीण भागात घडले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिक निर्मूलनविषयक जनजागृती वाढावी या उद्देशाने मगन संग्रहालयाच्या वतीने अभियान राबविण्यात आले. मांडवा येथील विवेक, तसेच सालोड येथील नेहरू विद्यालयात राबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक निर्मूलनाचे धडे देण्यात आले. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, दुकान, घराजवळच्या कचऱ्यात, रिकामी मैदाने तसेच शहरात जागोजागी आढळणाऱ्या प्लॅस्टिक बाटल्या संकलित केल्या. गोळा केलेल्या या प्लॅस्टिकच्या बॉटल उभ्या-आडव्या कापण्यात आल्या. टोच्याच्या मदतीनेखालील त्यास छिद्र करून कापलेल्या बाटल्यांमध्ये माती भरण्यात आली. प्लॅस्टिक बाटल्यांच्या बाहेरील बाजूस हिरवा रंग देण्यात आला. त्यावर फुला-पानांचे नक्षीकाम करण्यात आले. मगन संग्रहालयाच्या अध्यक्ष. डॉ. विभा गुप्ता, सुषमा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. 

प्लॅस्टिक बाटलीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कुंड्यांमध्ये नंतर शोभिवंत फुलझाडे तसेच भाजीपाला लागवड करण्यात आली. या माध्यमातून शाळा परिसरात परसबाग पुरविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमशीलतेचे आणि पर्यावरण रक्षणाचे सर्वदूर कौतुक होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

Soybean Farming: खेडच्या पूर्व भागामध्ये सोयाबीनला नवसंजीवनी

Kharif Season Crisis: पिके तहानली; उपसाबंदीने शेतकऱ्यांची कोंडी

Agriculture Department Staffing Plan: कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द

Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा

SCROLL FOR NEXT