State level brainstorming on soybean crop will be held in Latur 
मुख्य बातम्या

सोयाबीन पिकावर लातुरात होणार राज्यस्तरीय मंथन

कापसाला पिछाडत राज्याचे क्रमांक एकचे पीक ठरलेल्या सोयाबीन पिकातील भविष्यातील संधी, मूल्यवर्धन या संदर्भाने मंथन करण्याकरिता सोमवारी (ता. १६) लातूर येथील कृषी महाविद्यालयात सकाळी साडेनऊ वाजता राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

नागपूर ः कापसाला पिछाडत राज्याचे क्रमांक एकचे पीक ठरलेल्या सोयाबीन पिकातील भविष्यातील संधी, मूल्यवर्धन या संदर्भाने मंथन करण्याकरिता सोमवारी (ता. १६) लातूर येथील कृषी महाविद्यालयात सकाळी साडेनऊ वाजता राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादा भुसे तसेच इंदूर येथील सोयाबीन संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांची या वेळी उपस्थिती राहणार आहे.  

सोयाबीन, कपाशी ही राज्याची मुख्य पीक ओळखली जातात. ४२ लाख हेक्‍टरवर कापूस तर तितक्‍याच प्रमाणात सोयाबीनची लागवड राज्यात होते. या वर्षी मात्र दरातील तेजीच्या परिणामी शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती राहिली आहे. त्यामुळेच राज्यात या पिकाखालील क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली असून, ४२ लाख हेक्‍टरवर क्षेत्र विस्तारले आहे. मध्य प्रदेशपेक्षाही हे क्षेत्र अधिक असल्याचा दावा केला जात आहे. 

देशात सोयाबीन लागवड क्षेत्रात मध्य प्रदेशची आघाडी होती. या वर्षी मध्य प्रदेशातही सोयाबीनखालील क्षेत्रात घट झाल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे देशात सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळेच या पिकासाठी दर्जेदार बियाणे उपलब्धता, आदर्श व्यवस्थापन पद्धती, उत्पादकता वाढीसाठीचे पूरक तंत्रज्ञान, प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धन, बाजारपेठ अशा सर्वच मुद्यांवर या कार्यशाळेत मंथन होणार आहे.

राज्यात पूर्वी कापूस लागवड क्षेत्र अधिक होते. आता मात्र कापसाखालील क्षेत्र कमी होत सोयाबीन पहिल्या क्रमांकाचे पीक ठरले आहे. त्यामुळे बियाणे ते मूल्यवर्धन अशा टप्प्यावर साधकबाधक चर्चा व्हावी या उद्देशाने राज्यभरातील तज्ज्ञ, शेतकरी यांच्या उपस्थितीत लातूर येथे सोमवारी (ता.१६) कार्यशाळा होणार आहे. त्यानंतर जळगाव येथे कापूस पिकावर अशाच प्रकारची कार्यशाळा प्रस्तावित करण्यात आली आहे.  - दादा भुसे, कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT