sugar commissionar  
मुख्य बातम्या

‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड

साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक स्थितीतून जात होता. मात्र, समस्या असूनही देशात रास्त व किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) शेतकऱ्यांना रक्कम वाटण्यात राज्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक स्थितीतून जात होता. मात्र, समस्या असूनही देशात रास्त व किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) शेतकऱ्यांना रक्कम वाटण्यात राज्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे,’’ अशा शब्दांत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कौतुक केले. 

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) अद्ययावत सभागृहाचे उद्‌घाटन केल्यानंतर विस्माच्या पदाधिकाऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे या वेळी उपस्थित होते. 

राज्यातील १९० साखर कारखान्यांनी १५ जुलैपर्यंत १०१४ लाख टन ऊस खरेदी केला. यातून एफआरपीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २४ हजार कोटी रुपयांपेक्षा रक्कम जमा करण्यात आली आहे. आयुक्त या वेळी म्हणाले, की आगामी हंगामात १२ लाख ३१ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध असेल. त्यामुळे अतिरिक्त साखर तयार न करता कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा.’’ 

या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, विस्माचे सरचिटणीस पांडुरंग राऊत, कार्यकारी संचालक अजित चौगुले, कार्यकारी मंडळ सदस्य माधवराव घाटगे, रणजित मुळे, महेश देशमुख, अविनाश जाधव, सनदी लेखापाल रामेश्‍वर नेहेरे, साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर, संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे, सहसंचालक (प्रशासन) राजेश सुरवसे यांनी चर्चेत भाग घेतला.  आगामी हंगामात १०५ लाख टन उत्पादन शक्य ः ठोंबरे  आगामी हंगामात १६ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाईल, तसेच उत्पादन १०५ लाख टनांपर्यंत होईल, असा अंदाज ठोंबरे यांनी या वेळी व्यक्त केला. ‘‘१०० खासगी साखर कारखान्यांनी राज्यातील ४० टक्के साखर तयार केली आहे. इथेनॉल, सहवीज, बायोसीएनजी, सॅनिटायझर, ऑक्सिजननिर्मिती अशा आघाडीवर कामे करताना निर्यातदेखील महाराष्ट्राने यंदा आघाडी घेतली आहे,’’ असेही ठोंबरे यांनी नमूद केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT