राज्य सहकारी बॅंकेकडून साखर मूल्यांकनात १८० रुपयांनी कपात 
मुख्य बातम्या

राज्य सहकारी बॅंकेकडून साखर मूल्यांकनात १८० रुपयांनी कपात

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर खाली आल्याने अखेर राज्य सहकारी बॅंकेने पुन्हा मूल्यांकन कमी केले आहे. बुधवारी (ता.४) सायंकाळी साखर मूल्यांकनात १८० रुपयांची कपात केली आहे.  राज्य बॅंकेचे पूर्वीचे साखर मूल्यांकन प्रतिक्विंटल ३१०० रुपये होते, त्यावर ८५ टक्‍क्‍यांप्रमाणे २६३५ रुपये कारखान्यांना मिळत होते, यातून प्रक्रिया, कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष ऊस बिलासाठी १९०० रुपयेच मिळत होते. आज या मूल्यांकनात राज्य बॅंकेने १८० रुपयांची कपात करून ते प्रतिक्विंटल २९२० पर्यंत कमी केले, त्यामुळे आता कारखान्यांना मूल्यांकनाच्या ८५ टक्के म्हणजे २४८२ रुपये एवढीच उचल मिळेल, त्यातून प्रक्रिया व कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष उसाला पैसे देता येणार नाहीत, अशी स्थिती बनल्याचे सूत्रांनी सांगितले.  केंद्राने कारखान्यानुसार निर्यात करण्याचा कोटा जाहीर केला आहे. यामुळे ही साखर निर्यात करतानाच क्विंटलमागे ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. यातच राज्य बॅंकेने उचलीत कपात केल्याने आता कारखानदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हंगाम संपल्यानंतर काहीसा निवांतपणा अनुभवणाऱ्या कारखानदारांना राज्य बॅंकेने दणका दिला आहे. यामुळे ज्या कारखान्यांनी अद्याप पहिला हप्ताही ऊस उत्पादकांना दिला नाही, तो हप्ता देण्यास आणखी उशीर होऊ शकतो.  ज्या कारखान्यांनी जाहीर ३००० रुपयांपैकी २५०० रुपयेच अदा केले आहेत, त्या कारखान्यांची उत्पादकांना देय असणारी ५०० रुपयांची शिल्लक रक्कम तातडीने मिळणेसुद्धा धूसर झाल्याने आता या निर्णयामुळे ऊस उत्पादकच भरडला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT