विधिमंडळाचे अधिवेशन २५ पासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ ला 
मुख्य बातम्या

विधिमंडळाचे अधिवेशन २५ पासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ ला

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन २०१९ चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन येत्या २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मंगळवारी (ता.५) विधानसभा व विधान परिषदेची कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली, त्यात विधिमंडळाच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली.

अधिवेशनाचे कामकाज २ मार्च २०१९ पर्यंत चालणार आहे. सन २०१९-२०२० चा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. २ मार्च रोजी दुष्काळावर चर्चा करण्यासाठी या दिवशी कामकाज सुरू राहणार आहे. या अधिवेशनकाळामध्ये विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयके, तर विधान परिषदेचे एक प्रलंबित विधेयक मांडण्यात येणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारताची कृषी बाजारपेठ खुली करण्यासाठी काही मुद्द्यांवर सहमती; अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ग्रीअर यांची समितीसमोर माहिती

MSP Procurement : केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये; तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांची मागणी

Post Harvest Management: पॅकहाउस उभारणीसह प्रक्रिया पद्धती बसविताना...

Fertilizer Shortage: केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली; युरियाचा साठा स्थिर

Chilli Business Story: मिरची विक्रीला दिले व्यावसायिक रूप

SCROLL FOR NEXT