'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी सुरू करा'
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी सुरू करा' 
मुख्य बातम्या

'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी सुरू करा'

टीम अॅग्रोवन

गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने देसाईगंज तालुक्‍यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामातील हलक्‍या प्रतीचे धान पीक निघून एक महिन्याचा कालावधी झाला. मात्र, जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री करावी लागत आहे.  परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  संततधार पावसामुळे यापूर्वी शेतकऱ्यांकडील धानाची प्रत खालावली आहे. त्याचाही उत्पन्नावर परिणाम होणार आहे. व्यापारीदेखील याच कारणामुळे कमी दराने धान खरेदी करीत आहेत. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास काही अंशी स्पर्धा वाढून दरात तेजी येण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे या संदर्भाने वेळीच निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देसाईगंज तालुका ओबीस महासंघाचे अध्यक्ष लोकमान्य बरडे, ज्ञानेश्‍वर कवासे, चक्रधर पारधी, अॅड. संजय गुरू, धनपाल मिसार, जितेंद्र चौधरी, सतिश खरकाटे, दीपक प्रधान मोहन बगमारे, नारायण चौधरी, युवराज पत्रे, प्रा. दामोधर शिंगाडे, नेताजी राऊत, शंकर पारधी, प्रफुल्ल आठवले, पंकज तोंडरे, सुनील पारधी, गोपाल बोरकर यांनी पाठविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT